ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवड कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मिळाली उत्तम पॅकेजवर नोकरीची संधी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवड

कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मिळाली उत्तम पॅकेजवर नोकरीची संधी

इचलकरंजी:
येथील डीकेटीई संस्थेच्या कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग, अर्टिफिशियल इंटेलिजन्स अँण्ड मशिन लर्निंग (AIML) तसेच अर्टिफिशियल इंटेलिजन्स अँण्ड डेटा सायन्स (AIDS) विभागातील तब्बल ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर या नामांकित तंत्रज्ञान कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे.
ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, एम्बेडेड सिस्टीम्स, पॉवरट्रेन कंट्रोलर्स, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक नियंत्रण प्रणाली विकसित करणाऱ्या मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीने डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. संशोधन, उच्च दर्जाचे अभियांत्रिकी उपाय आणि जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमतेमुळे कंपनीने ऑटोमोबाईल आणि ई-मोबिलिटी क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे.
या निवड प्रक्रियेत डीकेटीईच्या कॉम्प्युटर विभागातील २२, एआयएमएल विभागातील ६ आणि एआयडीएस विभागातील ३ विद्यार्थ्यांची निवड झाली. एकूण ३१ विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजवर नोकरीची संधी प्राप्त झाली आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेऊन डीकेटीईमध्ये उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक संगणक तंत्रज्ञान, प्रोग्रॅमिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्सचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच संवाद कौशल्य, सादरीकरण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियमित प्रशिक्षण वर्गही घेतले जातात. त्यामुळे डीकेटीईचे विद्यार्थी उद्योगविश्वात यशस्वीपणे आपले स्थान निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. के. शिरगावे, डॉ. डी. व्ही. कोदवडे, डॉ. टी. आय. बागबान आणि टीपीओ जी. एस. जोशी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवड झालेले डीकेटीईचे ३१ विद्यार्थी.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा