मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ८० हजारांचे मिनी गंठन हिसकावले.शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल; अज्ञात चोरट्याचा शोध सुरू
इचलकरंजी:
मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन हिसकावून अज्ञात चोरट्याने पलायन केल्याची घटना मंगळवारी सकाळी इचलकरंजीत घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. लक्ष्मी दगडू लोटके (वय ६७, रा. बंडगर मळा, इचलकरंजी) या १६ जून रोजी सकाळी सुमारे ६.३५ वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी बंडगर माळ ते शाहू पुतळा मार्गावर चालत जात होत्या. टेक इट मार्केटसमोरील स्वामी समर्थ मंदिराजवळ पोहोचल्यावर एका अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील अंदाजे १५ ग्रॅम वजनाचे काळ्या मण्यांचे सोन्याचे मिनी गंठन बळजबरीने हिसकावून नेले.
चोरीस गेलेल्या दागिन्याची किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साने करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





