ICHMH51NEWS.IN
9921600800

जीतो लेडीज विंगतर्फे ‘उड्डाण शॉपिंग फिएस्टा २०२६’चे आयोजन; खरेदी, मनोरंजन आणि स्पर्धांची मेजवानी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जीतो लेडीज विंगतर्फे ‘उड्डाण शॉपिंग फिएस्टा २०२६’चे आयोजन; खरेदी, मनोरंजन आणि स्पर्धांची मेजवानी

इचलकरंजी :
महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या व्यवसायाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच स्वावलंबन आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जीतो लेडीज विंग इचलकरंजी यांच्या वतीने ‘उड्डाण शॉपिंग फिएस्टा २०२६’ या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उषा बोहरा व महावीर बागरेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा मेळावा दि. २० व २१ जून २०२६ रोजी अग्रसेन भवन, इचलकरंजी येथे होणार असून कर्नाटक,महाराष्ट्र,गुजरात, राजस्थान तसेच विविध शहरांतील उद्योजकांचा सहभाग असणार आहे. फॅशन, ज्वेलरी, होम डेकोर, लाइफस्टाइल, फूड, हस्तकला आणि इतर आकर्षक उत्पादनांचे स्टॉल्स या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत.
मेळाव्यात खरेदीसोबतच संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाची पर्वणी ठेवण्यात आली असून ‘ट्विनिंग ट्विन्स’ व ‘छत्री डेकोर’ स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांविषयी अधिक माहितीसाठी 93730 23683 आणि 88068 32098 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१८०सभासद असणाऱ्या जीतो लेडीज विंग मार्फत या वर्षीसाठी सर्व स्टॉल बुक झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.
तसेच मुलांसाठी विविध गेम्स, सेल्फी पॉइंट्स, फूड झोन आणि अनेक सरप्राईज आकर्षणे ठेवण्यात आली आहेत.
या कार्यक्रमासाठी जीतो चॅप्टर, युथ विंग आणि लेडीज विंग पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. यामध्ये जितो चॅप्टर चेअरपर्सन महावीरजी बागरेचा, चॅप्टर चीफ सेक्रेटरी मुकेश पुनमिया, ट्रेझरर मयंकजी बागरेचा, माजी अध्यक्ष जितूजी छाजेड, जितो युथ विंग चेअरपर्सन अक्षय बालर, युथ विंग चीफ सेक्रेटरी यश पहाडिया, उड्डाण कन्वेनर शशिजी सिंघवी, इव्हेंट कन्वेनर सपनाजी शाह व इव्हेंट को-कन्वेनर नीताजी बोरा यांचा सहभाग आहे.
तसेच जीतोचेअरपर्सन उषाजी बोहरा,चीफ सेक्रेटरी शैलीजी जैन, ट्रेझरर मुग्धाजी शाह, उड्डाण कन्वेनर शशिजी सिंघवी, इव्हेंट कन्वेनर सपनाजी शाह आणि को-कन्वेनर निताजी बोरा या आयोजनात कार्यरत आहेत.
शैली जैन यांनी आभार मानले
उडाण फेस्टिव्हलचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा