केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इचलकरंजी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकीत पूर्वतयारीचा आढावा
इचलकरंजी :
देशाचे केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री मा. श्री. अमितभाई शहा यांच्या २० जून रोजी होणाऱ्या इचलकरंजी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध उद्घाटन समारंभ आणि भव्य जाहीर सभेच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.
बैठकीस महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, आ.राहुल आवाडे,आमदार निरंजन डावखरे,माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, सौ.मौश्मी आवाडे, जिल्हा परिषद सदस्या सौ. सानिका आवाडे यड्रावकर, आदित्य आवाडे तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मा. अमितभाई शहा यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमांचे नियोजन, जाहीर सभेची रूपरेषा, वाहतूक नियंत्रण, सुरक्षा यंत्रणांचा समन्वय, कार्यकर्त्यांचे नियोजन, नागरिकांसाठी सुविधा तसेच विविध समित्यांच्या जबाबदाऱ्यांवर चर्चा करण्यात आली. संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यानंतर सर्व मान्यवरांनी केएटीपी ग्राऊंड येथे प्रत्यक्ष भेट देऊन सभास्थळाची पाहणी केली. प्रवेश व निर्गमन व्यवस्था, पार्किंग, सुरक्षा, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा आणि कार्यक्रमस्थळी सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी महापौर उदय धातूंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत बुगले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मा.अमितभाई शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने इचलकरंजीत होणारे उद्घाटन समारंभ आणि भव्य जाहीर सभा ऐतिहासिक ठरणार असून त्यासाठी सर्व स्तरांवर जय्यत तयारी सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









