महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त महानगरपालिकेकडून विनम्र अभिवादन
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त (तिथीनुसार) महानगरपालिका सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास उपायुक्त नंदू परळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याप्रसंगी शिक्षण अधिकारी बी. एम. कासार, सहायक आयुक्त नितीन बनगे, माजी सहायक आयुक्त विजय राजापुरे तसेच संदीप जोशी, सचिन शेडबाळे, परशराम पोवार, चंद्रकांत साळी आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
महाराणा प्रताप यांना अभिवादन करताना अति आयुक्त सुषमा शिंदे,उपायुक नंदू परळकर व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







