वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग पिसे,उपाध्यक्ष पंडित कोंडेकर,सचिवपदी संजय भस्मे तर खजिनदार पदी महेंद्र जाधव
इचलकरंजी:
येथील वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग पिसे व उपाध्यक्षपदी पंडीत कोंडेकर यांची फेरनिवड झाली आहे. सचिवपदी संजय भस्मे यांची सचिवपदी तर खजिनदारपदी महेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे. प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत या निवडी बिनविरोध पार पडल्या. नूतन संचालक मंडळात अभिजीत पटवा, दीपक पंडित, सचिन कांबळे, बाळासाहेब नरशेट्टी, रमेश सुतार, महादेव मिणची, विनोद जाधव, नारायण गुरबे, राकेश शेटके यांचा समावेश आहे. यामध्ये नविन चौघांचा समावेश करण्यात आला आहे. तर प्रसाद कुलकर्णी व मनोहर जोशी हे मार्गदर्शक मंडळात असतील. पुढील एक वर्षासाठी या निवडी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, संस्थेचा २९ वा वर्धापन दिन येत्या सप्टेंबरमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त यंदा एक दिवशीय सोहळा आयोजीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






