ICHMH51NEWS.IN
9921600800

हज २०२७ साठी यात्रेकरूंनी अर्ज सादर करावेत : हाजी सादिक जमादार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हज २०२७ साठी यात्रेकरूंनी अर्ज सादर करावेत : हाजी सादिक जमादार

इचलकरंजी:
हज यात्रा २०२७ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला २२ जुनपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हज कमिटी ऑफ इंडिया कडून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अंतिम तारीख २० जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातील इच्छुक हज यात्रेकरूंनी दिलेल्या कालावधीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन इचलकरंजी हज कमिटीचे अध्यक्ष सादिक जमादार यांनी केले आहे.
इचलकरंजी शहरातील चांदतारा मस्जिद येथील हज हाऊस येथे मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशन आणि हज कमिटीमार्फत ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची मोफत व्यवस्था केली आहे. बुधवार सकाळी १० वाजल्यापासून चांद तारा मज्जिद मर्कज वखार भाग येथे ही सेवा सुरू झाली आहे. इच्छुकांना अर्जासाठी पासपोर्ट, दोन पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रक्तगट माहिती, बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक, मोबाईल क्रमांक, तसेच वारसाची माहिती व त्याचे आधार कार्ड आदी कागदपत्रांच्या छायांकित
प्रती सह उपस्थित राहावे लागणार आहे. नियोजन बैठकीत मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष मुबारक मुजावर, इचलकरंजी हज कमिटीचे उपाध्यक्ष दिलावर शेख, डॉ असिफ शेख, डॉ मुनीर मकानदार, उस्मान पटेल सर, निसार अहमद कनवडे सर, मौलाना इम्तियाज, जाफर मुजावर,शहानूर कमालशा, इम्तियाज म्हैशाळे, वसीम मोमिन, आमदु मेस्त्री, नजीर काले,हारून सोलापूर,हिफजुल रहमान ,भालदार, सोहेल शहापूरे आदी उपस्थित होते. आभार फिरोज जमादार यांनी मानले.
यावर्षी सुद्धा ‘अल्पकालीन हज’ पर्याय
यावर्षी हज यात्रेसाठी ‘अल्पकालीन हज’ पर्याय प्रथमच उपलब्ध झाला आहे. ही यात्रा सुमारे २० दिवसांची असून, मदिना शरीफमध्ये २ ते ३ दिवस राहण्याची विशेष तरतूद आहे. या यात्रेसाठी स्वतंत्र कुर्रा (लॉटरी) प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्यांचे नाव अल्पकालीन हजच्या कुर्रात निघाले नाही, त्यांना सामान्य हजच्या कुर्रात समाविष्ट करण्यात येईल. एकदा अल्पकालीन हजसाठी नाव नोंदवल्यास ती प्रवास योजना सामान्य हजमध्ये बदलता येणार नाही.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा