रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगार कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार
इचलकरंजी, दि. २५ जून : इचलकरंजी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याने रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
मा. निलोत्पल, पोलीस अधीक्षक कोल्हापूर तसेच मा. आण्णासाहेब जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज विभाग यांच्या आदेशानुसार इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासून हद्दपार प्रस्ताव तयार करण्यात आले होते.
त्याअंतर्गत अविनाश शेखर जाधव उर्फ जर्मनी (रा. लिगाडे मळा, इचलकरंजी) याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खून, खंडणी, मारामारी, चोरी, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे एकूण ०६ गुन्हे तसेच ०१ प्रतिबंधात्मक कारवाई नोंद आहे. त्यास कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
तसेच आसिफ सलीम मुजावर (रा. म्हसोबा गल्ली क्र. १, जवाहरनगर, इचलकरंजी) याच्याविरुद्ध जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न यांसारखे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ०४ गुन्हे, जयसिंगपूर पोलीस ठाण्यात ०१ गुन्हा तसेच ०२ प्रतिबंधात्मक कारवाया नोंद आहेत. त्यालाही दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
सदर हद्दपार प्रस्तावांची चौकशी मा. विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी उपविभाग यांनी करून अहवाल मा. उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर मा. दीपक शिंदे, उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी विभाग यांनी अंतिम आदेश पारित केले.
सदर हद्दपार प्रस्ताव तयार करण्याचे काम शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून करण्यात आले. या प्रक्रियेमध्ये पो.कॉ. पवन गुरव यांनी प्रस्तावाचे कामकाज तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक सागर हारगुले यांनी चौकशी अहवालाशी संबंधित काम पाहिले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







