काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा नुतन सदस्यांची बैठक संपन्न.अ.भा.माहेश्वरी सभेसाठी 3 व महाराष्ट्र प्रदेश सभेसाठी 8 सदस्यांची निवड
इचलकरंजी –
काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नवनिर्वाचित कार्यकारी सदस्यांची बैठक येथील महेश भवन येथे माजी जिल्हा सभा अध्यक्ष चंदनमल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा सभा अध्यक्ष नितीन धूत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बैठकीस 81 सदस्य उपस्थित हाेते.
नुतन सचिव मुकेश खाबाणी यांनी स्वागत केले. मावळते सचिव लालचंद गट्टानी यांना मागील सभेचे इतिवृत्त सभागृहासमाेर सादर केले. त्याला उपस्थित सर्वच सदस्यांनी मंजुरी दिली.
जिल्हाध्यक्ष नितीन धूत यांनी, अखिल भारतीय माहेश्वरी सभेसाठी तीन आणि महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेसाठी आठ प्रतिनिधी पाठवायचे असून इच्छुक सदस्यांनी आपली नावे सादर करावीत, असे आवाहन केले. त्यानुसार अखिल भारतीय माहेश्वरी सभेसाठी 5 आणि महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेसाठी 13 नावे प्राप्त झाली. चंदनमल मंत्री यांच्या नेतृत्वाखाली नितीन धूत, द्वारकाधीश सारडा, पन्नालाल बिर्ला आणि घनश्याम इनानी यांच्या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार अखिल भारतीय माहेश्वरी सभेसाठी लालचंद गट्टाणी, चंद्रप्रकाश नवल व वासुदेव बांगड तर महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेसाठी रमाकांत मालू, दिलीप बजाज, श्यामसुंदर झंवर, रामनिवास मुंदडा, दामाेदर बाहेती, टोडरमल बांगड, बालकिशन टुवानी, आणि मनाेज राठी यांच्या नांवाची घाेषणा करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात चंदनमल मंत्री यांनी, निवडणुक काळात निर्माण झालेले मतभेद मिटवून आपल्याला मागील सत्राप्रमाणे या सत्रातही एकजुटीने सामाजिक उपयुक्त कार्य सुरू ठेवायचे असल्याचे आवाहन केले. शेवटी सचिव मुकेश खाबाणी यांनी आभार मानले. सभेप्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेशचंद दरगड, उपाध्यक्ष रामानारायण गट्टाणी, मनिष झंवर, दिपक बियाणी, काेषाध्यक्ष अशाेककुमार मंत्री, संघटन मंत्री बजरंगलाल काबरा,
युवा संगठन अध्यक्ष आनंद बांगड, तालुका अध्यक्ष दयानंद बाहेती व शैलेष लोया,
सहसचिव शिवप्रसाद तापडीया, सहसचिव सुरेंद्रकुमार हेडा आदींसह सदस्य उपस्थित हाेते.
काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या पहिल्या सभेप्रसंगी चंदनमल मंत्री, नितीन धुत, लालचंद गट्टानी, मुकेश खाबाणी, घनश्याम इनानी, वासुदेव बांगड, पन्नालाल बिर्ला, श्रीवल्लभ बांगड, साेहनलाल करवा आदी मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







