इचलकरंजी महानगरपालिकेसाठी ‘समग्र शिक्षा’ अंतर्गत 16 पदांना मंजुरी.शिक्षण विभागाला माेठा दिलासा : आमदार राहुल आवाडे यांचा पाठपुरावा
इचलकरंजी –
केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘समग्र शिक्षा’ अभियानांतर्गत इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग व शहर साधन केंद्र यांच्यासाठी विविध संवर्गातील एकूण 16 पदांना मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी या संदर्भातील अध्यादेश जारी केला आहे. या कामी आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून महानगरपालिका क्षेत्रातील शालेय शिक्षण विभागाच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाला माेठी गती मिळणार आहे. तसेच विद्यार्थी, शिक्षक व शाळांना अधिक प्रभावी सेवा उपलब्ध हाेण्यास मदत हाेणार आहे.
महानगरपालिका स्तरावर एकूण 4 पदे मंजूर करण्यात आली असून त्यामध्ये मनपा समन्वयक, डाटा एन्ट्री ऑपरेटर नि सहाय्यक आणि वरिष्ठ लेखा लिपिक तथा राेखपाल या पदांचा समावेश आहे. तर शहर साधन केंद्र स्तरावर 12 पदांना मंजुरी मिळाली असून त्यामध्ये 6 विषय साधनव्यक्ती, 1 एमआयएस समन्वयक, 1 डाटा एन्ट्री ऑपरेटर नि सहाय्यक, 1 वरिष्ठ लेखा लिपिक तथा राेखपाल आणि 1 कनिष्ठ अभियंता या पदांचा समावेश आहे.
इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी शहर साधन केंद्र मंजूर करून घेण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनीही वेळाेवेळी शासन स्तरावर पाठपुरावा करून या प्रस्तावाला गती मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. तसेच महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचे माेलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबराेबर उपायुक्त विद्या कदम, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांचेही माेलाचे सहकार्य मिळाले. या कामी महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी इरान पटेल व पर्यवेक्षक राजेंद्र घाेडके यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत मंजूर झालेल्या या 16 पदांमुळे इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभागाची प्रशासकीय क्षमता वाढणार असून, विद्यार्थी-केंद्रित विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, गुणवत्ता वृद्धी, डिजिटल व्यवस्थापन, आर्थिक नियंत्रण तसेच शाळांना तांत्रिक सहाय्य अधिक सक्षमपणे उपलब्ध हाेणार आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800