जयसिंगपूरात महेश नवमी उत्सव उत्साहात,समाजातील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान
इचलकरंजी –
माहेश्वरी समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी महेश नवमी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने समाजातील विविध मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत हाेते.
प्रारंभी जयसिंगपूर माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दीपक बियाणी यांनी स्वागत केले. जयसिंगपूर युवा संघटना 25 वा वर्धापनदिन साजरा करत असून युवा संघटनेचे अध्यक्ष कृष्णकांत बजाज यांनी संघटनेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
काेल्हापूर जिल्हाध्यक्ष नितीन धूत यांनी, माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टच्या नूतनीकरण केलेल्या रामवल्लभजी हरिकिशनजी बियाणी सभागृह व साै. रत्नाबाई मंगिलालजी बजाज भाेजन सभागृहाची प्रशंसा केली. जयसिंगपूर तहसील सभा आणि युवक संघटना प्रत्येक प्रयत्नात पाठिंबा व सहकार्य देण्यासाठी नेहमीच तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिराेळ तालुका अध्यक्ष शैलेश लाेया यांनी आभार मानले. याप्रसंगी जयसिंगपूर नगरपालिकेचे नगरसेवक प्रवीण बलदवा, महाराष्ट्र राज्य महिला संघटना (पश्चिम विभाग) उपाध्यक्षा उर्मिला बियाणी, जिल्हा महिला संघटना मंत्री श्रीमती पुष्पा मंधानिया, स्थानिक महिला संघटना अध्यक्षा विद्या मनियार, काेल्हापूर जिल्हासभा सचिव मुकेश खाबाणी, मावळते जिल्हासभा सचिव लालचंद गट्टानी तसेच महिला, किशाेरी मंडळ आणि युवक संघटनेच्या सदस्यांसह समाजातील प्रतिष्ठित सदस्य उपस्थित हाेते.
माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि माहेश्वरी युवा संघटनेच्या पुरस्कार साेहळ्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन धुत, मुकेश खाबाणी, दीपक बियाणी, कृष्णकांत बजाज, प्रविण बलदवा आदी मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







