डीकेटीईच्या १४ विद्यार्थ्यांची फिन्युलेंट कंपनीत आकर्षक पॅकेजवर निवड
इचलकरंजी, ता. २६ : येथील डीकेटीईच्या सिव्हील, इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल व ईटीसी विभागातील १४ विद्यार्थ्यांची नामांकित फिन्युलेंट सोल्यूशन्स प्रा. लि. या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे आकर्षक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे.
फिन्युलेंट कंपनी ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिक व्हेईकल्स, जनसेट्स आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन क्षेत्रासाठी पॉवरट्रेन कंट्रोल सिस्टीम्स, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्ट कंट्रोल सोल्यूशन्स विकसित करणारी अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. संशोधनाधिष्ठित कामकाज आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कंपनीने उद्योग क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
या निवड प्रक्रियेमध्ये डीकेटीईच्या सिध्दी भस्मे, वैष्णवी घारगे, फारुक मकानदार, अभिषेक कलकुटकी, सृष्टी सावंत, आनंद पाटील, प्रथमेश शेंडगे, प्रतिक्षा रोकडे, अंकिता पाटील, मृदुला पोतदार, सानिया नेमिष्टये, अनुजा घाटगे, स्नेहा कार्वेकर आणि निकिता ताटे या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाली.
उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार डीकेटीईमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, प्रोग्रॅमिंग, उद्योगाभिमुख प्रशिक्षण तसेच संवादकौशल्य व व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जातो. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
फिन्युलेंट कंपनीमध्ये निवड झालेले डीकेटीईचे १४ विद्यार्थी.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







