ICHMH51NEWS.IN
9921600800

फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महापौरांना सादर; कोणत्याही फेरीवाल्यावर अन्याय होणार नाही – उदय धातुंडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महापौरांना सादर; कोणत्याही फेरीवाल्यावर अन्याय होणार नाही – उदय धातुंडे

इचलकरंजी :
शहरातील फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी व फेरीवाले संघटनेच्या वतीने महापौर उदय धातुंडे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कोणत्याही फेरीवाल्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही महापौरांनी दिली.
निवेदनात शिवतीर्थ येथील दुकान गाळ्यांना धक्का लागू नये, फेरीवाला समितीला विश्वासात घेऊनच महासभेत निर्णय घ्यावेत, पुनर्वसनासाठी दिलेल्या जागा किमान ३० वर्षांसाठी उपलब्ध कराव्यात तसेच नव्याने कोणत्याही हॉकर्स झोनवर अतिक्रमण कारवाई करू नये, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
संघटनेने शिवतीर्थ, राजर्षी शाहू महाराज पुतळा व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील पुनर्वसित फेरीवाल्यांना दीर्घकालीन संरक्षण देण्याची मागणी केली. तसेच प्रांत कार्यालयाजवळील पुनर्वसन जागेवर दुकान गाळे उभारण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, पथविक्रेता समिती सदस्य अश्विनी कुबडगे, लक्ष्मी कांबळे, सुवर्णा कुसाळे, वेणूताई पोवार, राकेश माळी, समीर सोलापुरे, मनीष नायडू, श्रीनिवास फुलपाठी, रशीद आंबी, प्रकाश तोडकर, सचिन रणदिवे, यासिन बागवान, कमल बारवाडे, दिनकर पाटील, राजश्री सुतार, प्रल्हाद बावणे, मीनाताई साखरे, मुन्ना हारो गिरी, दिपक खटावकर, रमेश कांबळे, राजू गुप्ता, अजय काळे, महेश गोगकर, मुबारक शेख, मैनूद्दीन मोमीन, नारायण मुल्या यांच्यासह मोठ्या संख्येने फेरीवाले उपस्थित होते.

फेरीवाल्यांच्या समस्याबाबत निवेदन देताना फेरीवाले संघटनेचे पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा