मैत्री परिवार बहुउद्देशीय संस्थेचा शालेय साहित्य वितरण सोहळा उत्साहात संपन्न
इचलकरंजी :
मैत्री परिवार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित शालेय साहित्य वितरण सोहळा रविवारी महेश क्लब येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमांतर्गत २०० अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना सुमारे १५०० रुपये किमतीच्या शैक्षणिक साहित्य किटचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशआण्णा आवाडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. प्रीती पटवा, सौ. शैलजा शिंदे, अभिजित कवडे, राऊ वठारे आणि डॉ. सौ. आरती कोळी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने अध्यक्षीय कामकाज राजू काकणकी आणि संतोष वठारे यांनी पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित ढापळे यांनी केले, तर शैलेश गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी प्रकाशआण्णा आवाडे, ॲड. प्रीती पटवा, आनंद पटवा आणि डॉ. आरती कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मैत्री परिवाराच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
सूत्रसंचालन व्ही. जी. सुतार, प्रशांत आमणे आणि अमोल वस्तरे यांनी केले. राजू काकणकी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







