पदन्यासच्या विद्यार्थिनींचे शास्त्रीय कथ्थक नृत्य विशारद परीक्षेत यश
इचलकरंजी दि.५ जुलै-
येथील पदन्यास नृत्यकला अकादमी या संस्थेच्या विद्यार्थिनींनी शास्त्रीय कथ्थक नृत्य विशारद परीक्षेत चांगले यश प्राप्त केले. यामध्ये पूजा बसुदे हिने कथ्थक विशारद पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली, तर कलाश्री जोशी, रीतू पाटील, प्रियंका कदम आणि श्रावणी पारनाईक यांनी कथ्थक विशारद प्रथम या परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये यश मिळविले.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई व मिरज यांच्या वतीने सदरच्या परीक्षा एप्रिल व मे महिन्यात घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पदन्यासच्या वतीने कथ्थक व भरत नाट्यम नृत्यातील प्रारंभिक पासून विशारद पर्यंतच्या ११० विद्यार्थीनींनी परीक्षा दिली होती. यामध्ये १६ विद्यार्थिनींनी विशेष योग्यता, तर इतरांनी प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी मिळविली.
या सर्व विद्यार्थिनींना कथ्थक नृत्य अलंकार सायली होगाडे यांनी मार्गदर्शन केले तर कथ्थकच्या प्रारंभिक आणि प्रवेशिका प्रथम विद्यार्थिनींना कथ्थक नृत्य विशारद ज्योती सांगले व रेश्मा कोंडेकर यांनी मार्गदर्शन केले. सदरच्या परीक्षांसाठी हार्मोनियम व गायन साथ श्रीधर पाटील यांनी केली तर तबला साथ राजू पाटील यांनी केली. सर्व विद्यार्थिनींनी येथील पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळाच्या केंद्रातून परीक्षा दिल्या.
यशस्वी विद्यार्थीनीसोबत प्रशिक्षिका सायली होगाडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








