ICHMH51NEWS.IN
9921600800

महापालिकेच्या लोकशाही दिनात ३७ तक्रारी; अनेक विभागप्रमुख गैरहजर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिकेच्या लोकशाही दिनात ३७ तक्रारी; अनेक विभागप्रमुख गैरहजर

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेत सोमवारी (६ जुलै) आयोजित म.न.पा. स्तरीय लोकशाही दिनात नागरिकांकडून विविध विभागांशी संबंधित एकूण ३७ तक्रार अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक १२ तक्रारी मालमत्ता विभागाच्या, ६ बांधकाम विभागाच्या, ५ नगररचना विभागाच्या, ४ आरोग्य विभागाच्या, ३ पाणीपुरवठा विभागाच्या, तर मार्केट, कर, उद्यान, पशुशल्य, अतिक्रमण, आस्थापना आणि संगणक विभागाकडे प्रत्येकी एक तक्रार प्राप्त झाली.
लोकशाही दिनात नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कामकाज उपायुक्त अशोक कुंभार यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. यावेळी नगररचनाकार प्रशांत भोसले, आरोग्य विभागाचे मंगेश दुरुगकर, मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील आणि कर विभागाचे दीपक खोत उपस्थित होते.
मात्र, लोकशाही दिनास अनेक विभागप्रमुख अधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली. संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे काही तक्रारींवर तातडीने निर्णय होऊ शकला नसल्याची भावना तक्रारदारांनी व्यक्त केली. नागरिकांच्या प्रश्नांचे प्रभावी आणि त्वरित निराकरण करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी लोकशाही दिनाला उपस्थित राहणे आवश्यक असल्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा