इचलकरंजीत बेटिंग प्रकरणी संदीप नवनाळेला अटक; ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
इचलकरंजी
इचलकरंजीतील चर्चेत असलेल्या बेटिंग प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. या प्रकरणात संदीप रामाप्पा नवनाळे (रा. प्रियदर्शन कॉलनी, इचलकरंजी) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ९ जुलै २०२६ पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संदीप नवनाळे या गुन्ह्यात जामिनावर बाहेर होता सेशन कोर्टाने जामीन रद्द केल्यानंतर तो स्वतःहून पोलिसात हजर झाला असल्याची माहिती पो नि शरद मेमाणे यांनी दिली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







