ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात SIR मोहिमेला गती; 87 टक्के मतदारांपर्यंत निवडणूक आयोगाचे फॉर्म पोहोचले

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात SIR मोहिमेला गती; 87 टक्के मतदारांपर्यंत निवडणूक आयोगाचे फॉर्म पोहोचले

इचलकरंजी:

279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार पडताळणीचे काम वेगाने सुरू असून, 16 जुलै 2026 अखेरच्या अहवालानुसार एकूण 3 लाख 17 हजार 733 मतदारांपैकी 2 लाख 76 हजार 666 मतदारांपर्यंत (87.07 टक्के) निवडणूक आयोगाचे एन्युमरेशन फॉर्म (EF) पोहोचविण्यात आले आहेत.

अहवालानुसार मतदारसंघात 266 केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि 23 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून, मतदार पडताळणीचे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.

मतदार यादीतील 2 लाख 53 हजार 369 मतदारांचे प्री-SIR मॅपिंग पूर्ण झाले असून, त्याचे प्रमाण 79.74 टक्के इतके आहे.

दरम्यान, वितरित करण्यात आलेल्या फॉर्मपैकी 1 लाख 4 हजार 44 फॉर्म (32.75 टक्के) भरून प्राप्त झाले आहेत. तर Elector Self सुविधेद्वारे आतापर्यंत 311 मतदारांनी (0.10 टक्के) स्वतः ऑनलाइन फॉर्म सादर केले आहेत.

निवडणूक आयोगाच्या या विशेष मोहिमेत उर्वरित मतदारांनीही आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरून वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा