ICHMH51NEWS.IN
9921600800

जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त इचलकरंजीत १०० विद्यार्थ्यांसाठी विशेष बुद्धिबळ प्रदर्शन; २५ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचा होणार सत्कार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त इचलकरंजीत १०० विद्यार्थ्यांसाठी विशेष बुद्धिबळ प्रदर्शन; २५ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचा होणार सत्कार

इचलकरंजी :
 जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त  २० जुलै रोजी केन चेस अकादमी, इचलकरंजी आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पुरस्कार वितरण सोहळा व एकाच वेळी (Simultaneous Chess Exhibition) बुद्धिबळ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी येथे होणार असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे २५ आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळपटूंचा सत्कार समारंभ होणार आहे. तसेच २० रेटेड बुद्धिबळपटू एकाच वेळी १०० विद्यार्थ्यांविरुद्ध बुद्धिबळ सामने खेळणार असल्याने शहरातील बुद्धिबळप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.
या विशेष बुद्धिबळ प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी केवळ १०२ विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंसोबत प्रत्यक्ष बुद्धिबळ खेळण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.
सहभागासाठी इच्छुकांनी रोहित पोळ (केन चेस अकादमी) – ९६५७३३३९२६ या क्रमांकावर पूर्ण नाव व जन्म वर्ष पाठवून नोंदणी करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.
जागतिक बुद्धिबळ दिन उत्साहात साजरा करण्यासाठी शहरातील सर्व बुद्धिबळप्रेमी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व लायन्स ब्लड बँक ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा