ICHMH51NEWS.IN
9921600800

महापौरांच्या मध्यस्थीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण मागे २७ जुलैपर्यंत दोन कोटींची देयके; पुढील महिन्यांपासून दरमहा ५० लाखांचा निधी देण्याचा निर्णय

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापौरांच्या मध्यस्थीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण मागे

२७ जुलैपर्यंत दोन कोटींची देयके; पुढील महिन्यांपासून दरमहा ५० लाखांचा निधी देण्याचा निर्णय

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रॅच्युईटी व रजा अंशदानाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी २० जून २०२६ पासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर महापौर उदय धातुंडे यांच्या मध्यस्थीने यशस्वी सांगता झाली.
महापौर दालनात झालेल्या बैठकीत महापौर उदय धातुंडे यांनी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून तोडगा काढला. त्यानुसार येत्या २७ जुलैअखेर दोन कोटी रुपये अथवा ३० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके अदा करण्यात येतील, तसेच पुढील महिन्यापासून दरमहा ५० लाख रुपयांपर्यंतची देयके अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाला आमरण उपोषणास बसलेल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने मान्यता दिली. त्यानंतर सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, ज्येष्ठ नगरसेवक रवी रजपुते तसेच नगरसेवक सुशांत कलागते, प्रशांत नवनाळे, नागेश पाटील, मनोज साळुंखे आणि प्रमोद बचाटे उपस्थित होते.
सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रा. ए. बी. पाटील, शिवाजी जगताप, के. के. कांबळे, हरी माळी, संजय कांबळे आणि अनिस पठाण उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर उदय धातुंडे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा