डीकेटीईच्या २९ विद्यार्थिनींची कॅपजेमिनीमध्ये आकर्षक पॅकेजवर निवड
इचलकरंजी :
येथील डीकेटीई संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागातील तब्बल २९ विद्यार्थिनींची जागतिक कीर्तीच्या कॅपजेमिनी या आयटी कंपनीच्या पुणे कार्यालयात आकर्षक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे. स्पर्धात्मक कॅम्पस भरती प्रक्रियेत डीकेटीईच्या विद्यार्थिनींनी तांत्रिक ज्ञान, विश्लेषणात्मक क्षमता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळवले.
भरती प्रक्रियेत अॅप्टिट्यूड टेस्ट, तांत्रिक मुलाखत आणि एचआर मुलाखत अशा तीन टप्प्यांचा समावेश होता. प्रत्येक टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत विद्यार्थिनींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. डीकेटीईमध्ये प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण, अॅप्टिट्यूड डेव्हलपमेंट, तांत्रिक मार्गदर्शन, मॉक इंटरव्ह्यू, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासावर सातत्याने भर दिला जात असल्याने विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संधी मिळत असल्याचे संस्थेने सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये अहिल्या हपटे, मानसी कुरडे, ऋतूजा भुते, श्रुती होगाडे, नम्रता जाधव, साक्षी पाटील, वैष्णवी सावंत, प्रणोती आठवले, साक्षी बडे, श्रुती खवाटे, प्रियंका लंगोटे, पलक सारस्वत, अलिषा अत्तार, इशिता मेहता, सानिका पाटील, समिक्षा हेरवाडे, पूर्वा पवार, गौतमी पाटील, सानिया चव्हाण, साक्षी आरगे, श्रुती बोरा, अश्विनी पवार, तौसिया फकिर, आर्या दरीबे, मृणाली घनवट, प्रतिक्षा खडसरे, वैष्णवी पवार, विजयलक्ष्मी थावरे आणि पौर्णिमा जाधव यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे तसेच सर्व विश्वस्तांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थीनीचे छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








