डीकेएएससी महाविद्यालयात कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते ‘विवेक’ वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन
इचलकरंजी :
दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (डीकेएएससी) महाविद्यालयास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या ‘विवेक’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्त्यांशी संवाद साधत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व गुणवत्ता वृद्धी उपक्रमांची माहिती घेतली.
यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. आपल्या मनोगतात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी ‘विवेक’ वार्षिक नियतकालिकाच्या प्रकाशनाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला आणि बौद्धिक विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच वार्षिक अंकासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
या प्रसंगी डी. के. लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सी. एस. बागडी, प्रमुख संपादक डॉ. सुभाष जाधव, आयक्यूएसी प्रमुख डॉ. दीपक कुंभार, ग्रंथपाल डॉ. जे. यू. मुल्ला, डॉ. एस. एस. देसाई, प्रबंधक आर. बी. जोग, डॉ. सुनील भोसले, प्रा. विनायक भोई, डॉ. सुचय खोपडे, प्रा. रोहित शिंगे, प्रा. प्रथमेश गवळी यांच्यासह गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







