श्री संत नामदेव महाराज समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धांना प्रारंभ
इचलकरंजी –श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 676 व्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी व परिसरातील आंतरशालेय स्पर्धांना रविवारी प्रारंभ झाला. आंतरशालेय स्पर्धांचे हे 36 वे वर्ष आहे.श्री नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवनिमित्त प्रतिवर्षी श्री नामदेव समाज सेवा मंडळ व श्री संत नामदेव युवक संघटना यांच्यावतीने आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. रविवारी स्पर्धांचा शुभारंभ होऊन इयत्ता पहिली ते दहावी अशा सहा गटात चित्रकला स्पर्धा झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीपप्रज्वलन करण्यात आले.श्री संत नामदेव युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर यांनी स्वागत तर श्री नामदेव समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी प्रास्ताविक केले,यावेळी उद्घाटक उपमहापौर अनिल डाळ्या,एकनाथ सदावर्ते (अध्यक्ष,ना. स. प.पिंपरी चिंचवड), राजेंद्र पोरे (मुख्य विश्वस्त व अध्यक्ष ना. स. प. हडपसर), संदीप लचके,(अध्यक्ष ना. स. प. पुणे शहर), सुभाष मुळे (सेक्रेटरी ना. स. प. पुणे शहर), यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रा. अनिल अवसरे यांनी सूत्रसंचालन केले तर योगेश पाटूकले यांनी आभार मानले. याप्रसंगी श्री संत नामदेव समाजसेवा मंडळ श्री संत नामदेव युवक संघटना नामदेव महिला मंडळ यांचे सर्व पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.
आंतरशालेय स्पर्धाच्या शुभारंभ प्रसंगी नामदेव सेवा समाज मंडळाचे पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







