श्री आदिनाथ बँकेच्या वार्षिक सभेत १० टक्के लाभांश जाहीर
इचलकरंजी :
येथील श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना १० टक्के लाभांश (डिव्हिडंड) जाहीर करण्यात आला. ही सभा शनिवारी (दि. २५) मराठा मंडळ सांस्कृतिक भवन, तांबे माळ येथे उत्साहात पार पडली.
सभेच्या प्रारंभी आद्यतीर्थंकर भगवान आदिनाथ व संस्थापक स्व. आप्पासो मगदूम यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संचालक श्रेणिक मगदूम यांनी केले, तर वार्षिक अहवालाचे वाचन युवा संचालक राजू (अभयकुमार) मगदूम यांनी केले. त्यांनी बँकेची आर्थिक स्थिती, आरबीआय निकषांची पूर्तता, कोअर बँकिंग, डिजिटल व्यवहार, एटीएम, मोबाईल बँकिंग, यूपीआय, क्यूआर कोड तसेच सायबर सुरक्षा प्रणालीची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन बाळासाहेब पारीसा चौगुले यांनी १० टक्के लाभांश जाहीर करत बँकेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सभासद, ग्राहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. प्रमुख अतिथी स्वप्नील आवाडे यांनी कर्जवाटप व सीडी रेशो वाढवून नफा आणि भांडवल वृद्धीवर भर देण्याचा सल्ला दिला. विशेष अतिथी प्रकाश आवाडे (आण्णा) यांनी विविध शासकीय कर्ज योजनांद्वारे नवउद्योजक घडविण्याचे आवाहन केले.
सभेत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आदर्श ग्राहक म्हणून हुसेनबादशहा मुल्ला, आदर्श कर्मचारी म्हणून प्रशांत बरगाले यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट शाखा म्हणून कबनूर शाखेला ₹११,००० व स्मृतिचिन्ह देण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन तीर्थंकर माणगांवे यांनी केले.
सभेत बोलताना चेअरमन बाळासाहेब चौगुले व्यासपीठावर माजी मंत्री प्रकाश आवाडे,स्वप्निल आवाडे,श्रेणिक मगदुम
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







