ICHMH51NEWS.IN
9921600800

२२ कोटींचा कचरा संकलन मक्ता २४ नगरसेवकांनी केला एकमताने मंजूर; भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, विरोधकांचा बहिष्कार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

२२ कोटींचा कचरा संकलन मक्ता २४ नगरसेवकांनी केला एकमताने मंजूर; भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, विरोधकांचा बहिष्कार

इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या विशेष सभेत शहरातील घराघरातील कचरा संकलनासाठीचा २२ कोटी २६ लाख ३१८ रुपयांचा मक्ता अवघ्या दोन मिनिटांत उपस्थित २४ नगरसेवकांनी एकमताने मंजूर केला. दुसरीकडे हाळवणकर समर्थक भाजपचे १९, शिंदे गटाचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा १ असे एकूण २३ नगरसेवक गैरहजर राहिले, तर शिवशाहू विकास आघाडीच्या १८ नगरसेवकांनी सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभेवर बहिष्कार टाकला. कोरमसाठी आवश्यक २२ सदस्य उपस्थित असल्याने ठराव मंजूर करण्यात आला.
या निर्णयानंतर महानगरपालिका वर्तुळात भाजपमधील गटबाजीची जोरदार चर्चा रंगली. माजी आमदार सुरेशराव हाळवणकर आणि आमदार राहुल आवाडे यांच्या समर्थक नगरसेवकांमध्ये स्पष्ट फूट पडल्याचे चित्र समोर आले.
हाळवणकर समर्थकाची बैठकीत आमदार व आयुक्तांच्या तक्रारी.
विशेष सभेपूर्वी पक्ष निरीक्षक विक्रम पावसकर आणि माजी जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांच्या उपस्थितीत हाळवणकर समर्थक नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत स्थायी समितीने नामंजूर केलेल्या टेंडरमधील त्रुटी दूर करूनच ते पुन्हा मंजुरीसाठी आणणे अपेक्षित होते. मात्र तेच टेंडर कोणताही बदल न करता हुकूमशाही पद्धतीने महासभेत आणल्याची तक्रार करण्यात आली. नगरसेवकांना योग्य सन्मान मिळत नसल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला.
शहर स्वच्छ करून दाखवू-महापौर उदय धातूंडे
दरम्यान, महापौर उदय धातूंडे यांनी काही नगरसेवकांवर टीका करत, “काहींना शहराचा विकास पाहवत नाही. त्यांनी नेहमीच फोडाफोडीचे राजकारण केले आहे. मात्र या कचरा संकलन प्रकल्पाच्या माध्यमातून शहर अधिक स्वच्छ करून दाखवू,” असा दावा केला.
सभा बेकायदेशीर उच्चन्यायालयात जाणार-उदयसिंग पाटील
दुसरीकडे, विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी ही विशेष सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. कचरा संकलनाच्या मक्त्याला मंजुरी देण्याचा अधिकार स्थायी समितीचा असून महासभेत हा विषय आणणे नियमबाह्य असल्याचे सांगत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 
सभेनंतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करून आमदार, आयुक्त आणि महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या घडामोडींमुळे कचरा संकलनाच्या मक्त्याबरोबरच इचलकरंजीतील भाजपमधील अंतर्गत संघर्ष आणि आगामी राजकीय समीकरणांचीही चर्चा अधिक तीव्र झाली आहे
महापौर उदय धातूंडे सभेचे कामकाज करताना
विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली
भाजपचे विक्रम पावसकर व राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत हाळवणकर समर्थकांची बैठक झाली
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा