स्नेहल पाटील यांनी स्वीकारली निक्षय मित्र अंतर्गत पेशंटची जबाबदारी
१६ ऑगस्ट रोजी पीएचसी सिद्धनेर्ली येथील आस्वाद हॉटेल यांचे मालक व अनेक कामांमध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे सौ.स्नेहल श्रीकांत पाटील यांनी पीएचसी सिद्धनेर्ली अतंर्गत साके गावातील एक पेशंट आज पुढील ६ महिन्याकरीता दत्तक घेऊन पेशंट साठी स्वतः निक्षय मित्र झालेत व अजुन २ पेशंट ना असे मित्र मिळवून देणेसाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास पीएचसीसिद्धनेर्ली येथील वैद्यकीय अधिकारी ऐनापुरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने व शिंदे मॅडम, यांच्या उपस्थित,सुपरवायझर श्री.जोशी सर, सरनाईक सर, सौ एम.डी.काळे,फार्मसिस्ट श्री. मांगुरे सर, लॅब प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री. पालकर सर गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका STS व STLS व पीएचसीचा सर्व स्टाफ उपस्थित होता या कार्यासाठी सर्वात महत्वाचे योगदान कसबा सांगाव येथिल गटप्रवर्तक सुप्रिया गुदले यांचे असून त्यांच्याकडून च हे निक्षय मित्र मिळाले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800