बांधकाम कामगारांनी महायुती सोबत रहावे-आ.प्रकाश आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बांधकाम कामगारांनी महायुती सोबत रहावे-आ.प्रकाश आवाडे
इचलकरंजी –
राज्यातील महायुतीचे सरकार हे गतिमान असून गोरगरीब सर्वसामान्यांचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजनेतून सामान्य जनतेला उभारी देण्याचे काम करत आहे. त्यांना सामान्य तळागाळातील नागरिकांची सुख-दुःखे माहित आहेत. बांधकाम कामगारांनी सरकारच्या पाठीशी राहावे. त्यांच्यासाठी चांगल्या योजना राबवून प्रत्येकाला सक्षम केले जाईल, असे आवाहन आमदार प्रकाश आवडे यांनी केले.
इचलकरंजी बांधकाम समन्वय कृती समिती व शिव कामगार सेना यांच्या वतीने ताराराणी पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात आमदार आवाडे यांच्या हस्ते ४०० बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांडी संच वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
आमदार आवाडे यांनी, आठ संघटनांच्या  माध्यमातून बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविले जात आहेत. यातून ११ ते १२ हजार बांधकाम कामगार काम करीत आहेत. पूर्वी जनश्री कामगार योजनेतून विविध कामे करण्यात आली. सध्या महिला कामगारांची संख्याही मोठी आहे. प्रत्येकाला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. आम्ही चळवळीचे काम करणारे आहोत. समाजातील तळागाळातील आपलं कोणीतरी आहे, हा विश्वास आम्ही देत आलो आहे. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून इचलकरंजी मध्ये 52 हजार महिलांना लाभ मिळाला आहे. त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना विविध योजनाच्या माध्यमातून सक्षम बनवू. त्यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे, असे सांगितले.
 डॉ. राहुल आवाडे यांनी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे भगिनींच्या खात्यात जमा होत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी रक्षाबंधनपूर्वीच ओवाळणी दिली आहे. तसेच सरकारकडून वृद्धांना तीर्थक्षेत्र दर्शन, मुलींना मोफत उच्च  शिक्षण, सुशिक्षित बेरोजगारांना काम देत आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफ व शेतीमालाला हमीभाव देत आहे. हे अखंडित राहण्यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार आणण्याची गरज आहे. लोकसभेला इचलकरंजीतून खासदार माने यांना लीड देत आमदार आवाडे हे मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत. त्यांनी विधानसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर केली. पण मला त्यांचा मुलगा म्हणून नव्हे तर एक सामान्य कार्यकर्ता म्हणून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे मला आपले बहुमोल पाठबळ  देऊन विजयी करावे, असे आवाहन केले.
शिवसेना जिल्हा संघटक मोहन मालवणकर व माजी नगरसेवक संजय जाधव यांनी सर्व बांधकाम कामगार राहुल आवाडे यांच्या पाठीशी असून राहुल आवाडे यांना  विधानसभेत पाठवणार असल्याचे मत व्यक्त केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More