इचलकरंजी
वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेले इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. या शहरात जितका पुरुष काम करतो तितकीच मेहनत येथील माता-भगिनीही करतात. त्यामुळे यंत्रमाग व्यवसायाबरोबर गारमेंट व्यवसाय देखील आता प्रगतीपथावर आहे. आम्ही शासनाच्या माध्यमातून असो वा आपल्या बँकेच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सहकार्य केले आहे. येणाऱ्या काळातील महिलांनी उद्योग व्यवसायासाठी पुढे यावे त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या वतीने पक्ष कार्यालयात अनोखा रक्षाबंधन संपन्न झाला. त्याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते. तत्पूर्वी उपस्थित महिला भगिनींनी आमदार प्रकाश आवाडे व डॉ. राहुल आवाडे यांना राखी बांधली. यावेळी महिलांनी डॉ. राहुल आवाडे यांचे पुष्प वर्षाव करत जल्लोषात स्वागत केले.
आमदार आवाडे यांनी, मी डॉ. राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ जवळ आल्याने राहुल यांना संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढायचा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांने मीच राहुल आवाडे समजून घराघरात प्रचार करावा असे आवाहन केले.
डॉ. राहुल आवाडे यांनी, मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक विकासकामे केली आहेत. आपल्या मतदारसंघातील माता-भगिनींना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. महिलांनीही पुढाकार घेऊन स्वावलंबी बनावे. त्यासाठी सर्वतोपारी सहकार्य करू असे सांगितले.
स्वागत ताराराणी महिला आघाडी कार्याध्यक्षा नजमा शेख यांनी तर प्रास्ताविक महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड यांनी केले. याप्रसंगी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दतवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, मौसमी आवाडे, सपना भिसे, अर्चना कुडचे, सीमा कमते, शोभा भाट, संगीता नरंदे, वैशाली पाटील, शैलजा पाटील, शिल्पा पोवार, सुनिता आडके, गिरीजा हेरवाडे, नंदा साळुंखे, सविता मोरे, जयश्री शेलार, अंजुम मुल्ला, मंगला सुर्वे, सुप्रिया शिंदे, संजीवनी पाटील, दिपाली लोटे, सुवर्णा लाड, सोनाली तारदाळे, फुलाबाई वाणी, हेमा खोत यांच्यासह ताराराणी पक्षाच्या पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800