ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत १५ ऑगस्टला मोफत बुद्धिबळ कॅम्प; १६ ऑगस्टला ओपन चेस टीम चॅम्पियनशिप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत १५ ऑगस्टला मोफत बुद्धिबळ कॅम्प; १६ ऑगस्टला ओपन चेस टीम चॅम्पियनशिप

इचलकरंजी : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केन चेस अकॅडमी इचलकरंजीतर्फे व चेसबेस इंडियाच्या सहकार्याने **‘द बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प २०२६’**चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १६ ऑगस्ट रोजी ‘२nd केन ओपन चेस टीम चॅम्पियनशिप २०२६’ होणार आहे. दोन्ही उपक्रम स्व. सौ. प्रतिभा बाळासाहेब लांडे सांस्कृतिक भवन व डॉ. दिलीप ललासाहेब देशमुख हॉल, यशवंत प्रोसेस मागे, कल्याण केंद्र रोड, इंडस्ट्रीयल इस्टेट येथे होणार आहेत.

१५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणारा चेस कॅम्प पूर्णपणे मोफत असून, सर्व वयोगटातील बुद्धिबळप्रेमींसाठी खुला आहे. अनुभवी प्रशिक्षकांकडून मूलभूत ते प्रगत बुद्धिबळ प्रशिक्षण, डावपेच व रणनीतीचे मार्गदर्शन तसेच विविध मनोरंजक चेस अॅक्टिव्हिटींचे आयोजन करण्यात आले आहे. मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी (MAI) हे कॅम्पचे व्हेन्यू पार्टनर आहेत.

दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी चेस असोसिएशन कोल्हापूर व चेस असोसिएशन इचलकरंजी यांच्या मान्यतेने, MAI व केन चेस अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने टीम चॅम्पियनशिप होणार आहे. एका संघात चार खेळाडू असून एकूण सात फेऱ्या होतील. प्रत्येक खेळाडूस १० मिनिटे अधिक ५ सेकंद इन्क्रिमेंट वेळ मिळणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता होईल.

स्पर्धेसाठी १५ हजार रुपये रोख, १४ चषक व १२ पदकांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्या संघाला ५ हजार, उपविजेत्यास ३ हजार व तृतीय क्रमांकास २ हजार रुपये व चषक मिळणार आहे. तसेच विविध विशेष गटांसाठी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

प्रवेश फी ५०० रुपये असून अंतिम तारीख १४ ऑगस्ट आहे. अधिक माहितीसाठी रोहित पोळ (९६५७३३३९२६, ९०९६२२११७८) व विजय सर (९१३०७४३१११) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा