ICHMH51NEWS.IN
9921600800

इनरव्हील क्लबतर्फे २१ व २२ ऑगस्टला ‘शॉपिंग एक्स्पो’

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इनरव्हील क्लबतर्फे २१ व २२ ऑगस्टला ‘शॉपिंग एक्स्पो’

इचलकरंजी : इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजीतर्फे महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी २१ व २२ ऑगस्ट रोजी अग्रसेन भवन येथे ‘शॉपिंग एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविला जात असून, यंदाही महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश व कर्नाटकातील विविध भागांतील महिला उद्योजक व व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा एक्स्पोचा प्रमुख उद्देश आहे. नागरिकांना एकाच छताखाली विविध प्रकारची उत्पादने व वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. स्टॉलधारक व ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी ड्रॉ व बंपर ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या स्टॉलधारकांसाठी अग्रसेन भवन येथे निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

एक्स्पोमधून मिळणाऱ्या निधीतून क्लबतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. मेडिकल कॅम्प, कानाच्या शस्त्रक्रिया शिबिरे, गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेण्याचे काम केले जाते.

नागरिकांनी मोठ्या संख्येने एक्स्पोला भेट देऊन महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे आणि समाजोपयोगी कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन अध्यक्ष मुग्धा शहा, सचिव ईशा खंडेलवाल, प्रोजेक्ट चेअरमन पूनम मोहता, को-प्रोजेक्ट चेअरमन श्रद्धा झंवर,सपना शहा यांच्यासह क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा