हर घर तिरंगा अभियानात इचलकरंजीकरांनी सहभागी व्हावे
इचलकरंजी : भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत ९ ते १७ ऑगस्टदरम्यान शहरातील नागरिक, खाजगी व शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांनी आपल्या घरावर व परिसरात राष्ट्रध्वज फडकवून उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे. राष्ट्रध्वज फडकविताना त्याचा सन्मान, प्रतिष्ठा व पावित्र्य अबाधित राखावे, तसेच भारतीय ध्वज संहितेतील नियमांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. जुलै २०२२ मधील ध्वज संहितेतील सुधारणेनुसार नागरिकांना दिवसा तसेच रात्रीही राष्ट्रध्वज फडकविता येतो. राष्ट्रध्वज हा देशाच्या एकता, अखंडता व स्वाभिमानाचे प्रतीक असून, अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रप्रेम व्यक्त करावे, असे आवाहन करण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






