ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिरमध्ये ग्रंथपाल दिन उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिरमध्ये ग्रंथपाल दिन उत्साहात संपन्न

इचलकरंजी (ता. १३) : आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी येथे बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी ग्रंथपाल दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे यांनी केले. प्रमुख पाहुणे व्यंकटेश महाविद्यालयाचे ग्रंथपाल महेश केसरकर यांचा परिचय कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी करून दिला.

केसरकर यांनी ग्रंथपालाचे कार्य हे पवित्र ज्ञानदानाचे कार्य असून, वाचकांना त्यांच्या अपेक्षेनुसार ग्रंथ उपलब्ध करून देणे हे ग्रंथपालांचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले.

ग्रंथपाल दिनानिमित्त हातकणंगले तालुक्यातील सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथपाल व उपग्रंथपालांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांक राजू बसप्पा बिद्रेवाडी (भगवान बाबा वाचन मंदिर, यड्राव), द्वितीय अश्विनी सतीश परमाज (कै. वालुबाई भ्र. मगनचंद शहा सार्वजनिक वाचनालय, हेरले) आणि तृतीय अरुणकुमार अंकुश पिसे (स्व. सौ. लीला पितांबर माळवदे वाचनालय, रेंदाळ) यांनी मिळविला. उत्तेजनार्थ योगिता योगेश कुलकर्णी व सुरेखा संजय श्रीराम यांना पारितोषिक देण्यात आले.

यावेळी उपस्थित ग्रंथपाल, उपग्रंथपाल व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक मीनाक्षी तंगडी यांनी केले. संचालक माया कुलकर्णी यांच्यासह तालुक्यातील ग्रंथपाल, उपग्रंथपाल व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. S. R. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना डावीकडून कार्यवाह प्रा. मोहन पुजारी. प्रमुख पाहुणे महेश केसरकर. उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे. ग्रंथपाल आनंदा काजवे. सहाय्यक ग्रंथपाल सुनीता सामंत

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा