ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीई टेक्स्टाईलची चार दशकांची १०० टक्के प्लेसमेंटची परंपरा कायम २३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड; ट्रायडेन्टमध्ये १२ लाखांचे पॅकेज

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीई टेक्स्टाईलची चार दशकांची १०० टक्के प्लेसमेंटची परंपरा कायम

२३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड; ट्रायडेन्टमध्ये १२ लाखांचे पॅकेज

इचलकरंजी, ता. १३ : डीकेटीईच्या बी.टेक. टेक्स्टाईल विभागाने सर्व प्रोग्राम कोर्समध्ये गेल्या चार दशकांपासून सुरू असलेली १०० टक्के प्लेसमेंटची परंपरा यंदाही कायम राखली आहे. देश-विदेशातील नामांकित वस्त्रोद्योग कंपन्यांनी विद्यार्थ्यांची निवड करून डीकेटीईच्या उद्योगाभिमुख शिक्षणावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ५० हून अधिक कंपन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी भेट दिली. त्यातून २३८ विद्यार्थ्यांची निवड झाली. रिलायन्स, रेमण्ड, ट्रायडेन्ट, वर्धमान, डायस्टार, आदित्य बिर्ला, शाही एक्स्पोर्ट्स, वेलस्पन, अलोक, इंडोकाउंट, कॉटनकिंग, कुसुमगर, एव्हायएम सिंटेक्स, अतुल लि., एपिक ग्रुप आणि क्लासिक फॅशन आदी कंपन्यांचा त्यात समावेश आहे.

ट्रायडेन्ट कंपनीमध्ये तीन विद्यार्थ्यांची प्रत्येकी १२ लाख रुपये पॅकेजवर निवड झाली. दरवर्षी टेक्स्टाईल विभागातील सुमारे ६०० विद्यार्थी हिवाळी सुट्टीत देश-विदेशातील विविध उद्योगांमध्ये प्रशिक्षण घेतात. यंदा ५४ विद्यार्थ्यांची प्री-प्लेसमेंटद्वारे इंटर्नशिपसाठी निवड झाली असून त्यांना ७,५०० ते ५० हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळाला.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, सर्व विश्वस्त, संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक डॉ. यू. जे. पाटील व टीपीओ प्रा. एस. बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो ओळी : डीकेटीईमधील विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचा समूह.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा