ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा ई- बाईक व बाईक रॅली उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा ई- बाईक व बाईक रॅली उत्साहात संपन्न

इचलकरंजी
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ व्हावी या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने तिरंगा ई-बाईक व बाईक रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी इचलकरंजी महानगरपालिका कार्यालय येथून आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक आणि सभागृह नेते विठ्ठल चोपडे तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. हातात व वाहनांवर तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झालेल्या महानगरपालिका अधिकारी कर्मचारी देशभक्तीचा उत्साह निर्माण केला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी रॅलीचा मार्ग दुमदुमून गेला.
महानगरपालिका कार्यालयातून सुरू झालेली रॅली शिवतीर्थ, गांधी पुतळा चौक, राजवाडा चौक, नाट्यगृह चौक, चांदणी चौक, संभाजी चौक, तीन बत्ती चौक, शाहू पुतळा या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा इचलकरंजी महानगरपालिका कार्यालय येथे पोहोचली आणि रॅलीचा समारोप झाला.
‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे तसेच स्वातंत्र्य दिनाचा उत्सव व्यापक लोकसहभागातून साजरा करणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश होता. नागरिकांनीही रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रध्वजाप्रती आपला सन्मान आणि देशाप्रती असलेली भावना व्यक्त केली.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने पार पडलेल्या या तिरंगा रॅलीने शहरात देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्राभिमानाचा जागर केला.
   आजच्या या रॅलीमध्ये सहा आयुक्त सुनिल शिंदे, सहा आयुक्त रामचंद्र कांबळे, सहा आयुक्त नितिन बनगे, घनकचरा विभाग प्रमुख धनंजय पळसुले, क्रीडा अधिकारी संजय शेटे, सदाशिव जाधव, प्रदीप झमरी , गणेश शिंदे, अजय जाधव, सचिन खोंद्रे आदींसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा