ICHMH51NEWS.IN
9921600800

राधाकृष्ण चौकात पोलिस गस्त वाढवा; सीसीटीव्ही कॅमेरे बसवा नगरसेविका विजया महाजन यांची गावभाग पोलिसांकडे मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राधाकृष्ण चौकात पोलिस गस्त वाढवा; सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

नगरसेविका विजया महाजन यांची गावभाग पोलिसांकडे मागणी

इचलकरंजी, ता. १२ : राधाकृष्ण चौक परिसरात चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील पोलिस गस्त तातडीने वाढवावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नगरसेविका विजया सुनील महाजन यांनी गावभाग पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.

राधाकृष्ण चौकात मंगळवारी रात्री काही हुल्लडबाजांनी चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली. याबाबत गावभाग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरात नियमित गस्त वाढवून अशा समाजकंटकांवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी महाजन यांनी केली आहे.

राधाकृष्ण चौक हा शहरातील गजबजलेला परिसर असून, येथे यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या नसल्याचे महाजन यांनी पत्रात नमूद केले आहे. रात्रीच्या वेळी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई न झाल्यास भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राधाकृष्ण चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेही गरजेचे आहे. त्यामुळे परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यास तसेच भविष्यातील घटनांचा तपास करण्यास पोलिसांना मदत होईल, असेही महाजन यांनी म्हटले आहे.

याबाबत तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका विजया महाजन यांनी केली आहे.यावेळी विनय महाजन व भागातील नागरिक उपस्थित होते.

पो.नि.महेश चव्हाण यांना निवेदन देताना विजया महाजन,विनय महाजन

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा