ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिरात आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिरात आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

इचलकरंजी (ता. १३) : आपटे वाचन मंदिराच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त साहित्यसम्राट न. चि. केळकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आपटे वाचन मंदिराच्या बजाज सभागृहात होणार असून, स्पर्धेनंतर लगेच बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या शिफारशीसह आपले नाव व निवडलेल्या विषयाचे नाव सोमवार, दि. १७ ऑगस्टपूर्वी आपटे वाचन मंदिर येथे पाठवावे. प्रवेश शुल्क ३० रुपये आहे. स्पर्धकांना पुढीलपैकी एका विषयावर सात मिनिटे मराठीतून वक्तृत्व करावे लागेल. ‘आधुनिक जीवनशैली आणि मानसिक आरोग्य’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) : संधी की आव्हान?’, ‘लोकमान्य टिळक आणि आजचा युवक’, ‘सायबर गुन्हे आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा’ तसेच ‘युद्ध नको, बुद्ध हवा!’ हे विषय आहेत.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ७ हजार ५०० रुपये रोख, प्रशस्तीपत्र व फिरते लोकमान्य टिळक स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांकास ५ हजार, तृतीय क्रमांकास ३ हजार ५०० रुपये तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी २ हजार रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी आपटे वाचन मंदिर, राजवाडा चौक, इचलकरंजी येथे किंवा ९१७५६३६२५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा