रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या १२ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
इचलकरंजी :
नुकत्याच जाहीर झालेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता चौथीचे चार आणि इयत्ता सातवीचे आठ असे एकूण १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. या यशाबद्दल इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, शिक्षण सभापती सौ. विद्या साळुंखे, नगरसेवक नितेश पोवार, दीपक रावळ, प्रशासनाधिकारी इरफान पटेल, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत शहरात अव्वल कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉ. अलका शेलार यांच्या कुशल मार्गदर्शनाचे व नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या यशासाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षकवृंदाचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





