ICHMH51NEWS.IN
9921600800

महापालिका मुख्य इमारतीतील लिफ्टचे आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते उद्घाटन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिका मुख्य इमारतीतील लिफ्टचे आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते उद्घाटन

इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसाठी बसविण्यात आलेल्या नूतन लिफ्टचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

यावेळी महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये विविध विभागांची कार्यालये असून, प्रशासकीय कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. लिफ्टची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच इतर नागरिकांना इमारतीतील वरील मजल्यांवरील कार्यालयांमध्ये जाणे सुलभ होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी नगरसेवक रवी रजपुते, संतोष शेळके, अविनाश कांबळे, मारुती पाथरवट यांच्यासह नागेश पाटील, प्रसाद इंगवले, संतोष कुपटे, राजू पुजारी तसेच उपायुक्त नंदु परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर आदी उपस्थित होते.

लिफ्टचे उद्घाटन करताना आ.राहुल आवाडे,महापौर उदय धातूंडे,आयुक्त पल्लवी पाटील

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा