ICHMH51NEWS.IN
9921600800

सेकंड केन ओपन बुद्धिबळ सांघिक स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सेकंड केन ओपन बुद्धिबळ सांघिक स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

इचलकरंजी :

केन चेस अकॅडमी, इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित ‘2nd Ken All India Open Team Chess Championship 2026’ या बुद्धिबळ सांघिक स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. १६ ऑगस्ट) डॉ. दिलीप लालासाहेब देशमुख हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाले.

या स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील ५० संघ सहभागी झाले असून, प्रत्येक संघात चार खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे २०० हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील पाच फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर १० गुणांसह फाईट क्लब संघाने आघाडी घेतली आहे. केन किंग्स, इचलकरंजी आणि मास्टरमाइंड मंडली या संघांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळविले आहे.

उद्घाटनप्रसंगी मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष डॉ. नितीन जाधव, सचिव डॉ. अमित देशमुख, खजिनदार डॉ. उत्तम माळी, क्रीडा समिती अध्यक्ष डॉ. श्रीधर जाधवडॉ. अभिजीत कलवडे, केन एंटरप्रायजेस लिमिटेडचे संचालक निकुंज बगडिया तसेच केन चेस अकॅडमीचे प्रोप्रायटर व मुख्य प्रशिक्षक रोहित पोळ उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते बुद्धिबळाचा पहिला डाव सुरू करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना शिस्त, संयम आणि क्रीडा भावना जपत उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध ठिकाणांहून आलेल्या खेळाडूंमुळे स्पर्धेच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्पर्धेत चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा