ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत २३ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन जीवन संपविले

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत २३ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन जीवन संपविले

इचलकरंजी :
शहरातील सुदर्शन चौक परिसरात २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरातील अभ्यासाच्या खोलीत सिलींग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना मंगळवारी (१८ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास घडली.
हिंदवी म्हाळसाकांत कवडे (वय २३, रा. सुदर्शन चौक, इचलकरंजी) असे मयत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंदवी हिला अभ्यासाचे टेन्शन असल्याने रक्तदाबाचा त्रास जाणवला होता. त्यानंतर तिला डॉक्टरांकडे दाखविण्यात आले. उपचारानंतर ती अभ्यास करत असलेल्या खोलीत झोपली होती.
दरम्यान, पहाटेच्या सुमारास तिने अभ्यासाच्या खोलीतील सिलींग फॅनला पोपटी रंगाच्या ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तिला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मंदार मार्तंड कवडे यांनी पोलिसांना दिली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल १३१६ शिंदे करीत आहेत. दाखल सहायक फौजदार अनिल चव्हाण यांनी केली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा