ICHMH51NEWS.IN
9921600800

हॉटेलबाहेरील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मॅनेजरचा दगडाने मारहाणीत मृत्यू; दोन्ही आरोपी ताब्यात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हॉटेलबाहेरील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मॅनेजरचा दगडाने मारहाणीत मृत्यू; दोन्ही आरोपी ताब्यात

इचलकरंजी : हॉटेलबाहेर एका महिलेसोबत सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मॅनेजरवर दोघांनी मारहाण केल्याची घटना यड्राव येथील पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात घडली. या मारहाणीत डोक्यात दगड लागल्याने गंभीर जखमी झालेल्या मॅनेजरचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृताचे नाव अल्बर्ट हॅरीबेनी एम्ब्रोस (वय ५३, रा. समतानगर, मिरज, सांगली) असे आहे. ते यड्राव येथील हॉटेल अॅकॉर्ड इंटरनॅशनलमध्ये मॅनेजर म्हणून काम करीत होते.

याबाबत हॉटेलचे मालक प्रसाद शुभन्ना शेट्टी (वय ५८, व्यवसाय हॉटेल, रा. तिरंगा चौक, पुजारी मळा, इचलकरंजी) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता हॉटेल अॅकॉर्ड इंटरनॅशनल, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, यड्राव येथे आरोपी गंगा प्रविण पाटील (वय २१, रा. यड्राव, ता. शिरोळ) आणि अशपाक सिकंदर नदाफ (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) हे हॉटेलच्या बाहेर एका महिलेसोबत वाद घालत होते.

यावेळी हॉटेल मॅनेजर अल्बर्ट एम्ब्रोस हे वाद मिटवण्यासाठी आरोपींकडे गेले. त्यावेळी त्यांच्यात वाद वाढला आणि मारहाण झाली. या दरम्यान आरोपी क्रमांक एक गंगा पाटील याने एम्ब्रोस यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा