ICHMH51NEWS.IN
9921600800

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पुण्यतिथी निमित्त भव्य प्रभात फेरी संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पुण्यतिथी निमित्त भव्य प्रभात फेरी संपन्न

इचलकरंजी :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त इचलकरंजी शहरातील संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीने भव्य प्रभात फेरी उत्साहात संपन्न झाली. इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय, दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल आणि गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या पाचही ज्ञानशाखांच्या संयुक्त विद्यमाने या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी झाले.
प्रभात फेरीची सुरुवात डी. के. ए. एस. सी. महाविद्यालय येथून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेविका प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्राचार्य डॉ. एस. के. खाडे, प्राचार्य डॉ. चंद्रानी बागडी, मुख्याध्यापक श्री. ढेरे, मुख्याध्यापिका सौ एस. व्ही. पाटील यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सत्र पार पडले. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे पुण्यतिथी निमित्त भव्य प्रभात फेरी संपन्न झाली. प्रभातफेरी डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयातून राजर्षी शाहू महाराज पुतळा, शिवतीर्थ, शंभूतीर्थ, राजाराम स्टेडियम, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, तांबे माळ मार्गे पंचवटी चित्रमंदिर पासून   कन्या महाविद्यालय येथे प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला.
या प्रभात फेरीत हजाराहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी व गुरुदेव कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांमुळे व ढोल-ताशांच्या गजरामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. एनसीसी व एनएसएस विभागातील कॅडेट्स व स्वयंसेवकांनी नियोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आभार मानले, तर प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रथमच संपन्न झालेल्या भव्य प्रभात फेरीमुळे शहरात चैतन्याचे वातावरण होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा