ICHMH51NEWS.IN
9921600800

संस्कार शिकवण्याची नव्हे, आचरणातून घडवण्याची गोष्ट : प्रथमेश इंदुलकर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संस्कार शिकवण्याची नव्हे, आचरणातून घडवण्याची गोष्ट : प्रथमेश इंदुलकर

इचलकरंजी : डिजिटल युगात मुलांच्या वर्तनातील बदलांसाठी केवळ मुलांना दोष न देता संस्कारांचा विचार करणे गरजेचे आहे. संस्कार ही शिकवण्याची गोष्ट नसून पालकांच्या वागण्या-बोलण्यातून, आचरणातून आणि वाचनातून ते मुलांमध्ये रुजतात, असे प्रतिपादन युवा व्याख्याते व प्रवचनकार ह.भ.प. प्रथमेश इंदुलकर यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व प्रोबस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘संस्कार’ या विषयावर ते बोलत होते. आपल्या पहाडी आवाजात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची पर्वा न करता लढलेल्या क्रांतिकारकांचा जीवनप्रवास सांगत संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.

आज डिजिटल युगात मुले भरकटत चालली आहेत; मात्र यामागे मुलांचा दोष नसून संस्कारांचा अभाव हे महत्त्वाचे कारण आहे, असे त्यांनी सांगितले. घर बांधताना देवघर नसले तरी चालेल; मात्र वृद्ध आई-वडिलांना समाधानाने जगता येईल, अशी स्वतंत्र खोली नक्की बांधा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कोठारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव सुनील यळरूटे यांनी साप्ताहिक कार्याचा आढावा घेतला. प्रथमेश इंदुलकर यांचा परिचय विठ्ठलराव डाके यांनी करून दिला, तर रवींद्र सौंदत्तीकर यांनी आभार मानले.

यावेळी रोटरी व प्रोबस क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना प्रथमेश इंदुलकर व्यासपीठावर प्रेसिडेंट पंकज कोठारी व पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा