अस्मिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास केंद्र आणि जिद्द अकॅडमी यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) संपन्न
इचलकरंजी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे दि. २१ ऑगस्ट रोजी अस्मिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास केंद्र आणि जिद्द अकॅडमी यांच्यामध्ये MoU (सामंजस्य करार) करण्यात आला. या करारांतर्गत ‘स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर जिद्द अकॅडमीचे श्री. पवन कांबळे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. त्यांनी या MOU अंतर्गत स्पर्धा परीक्षेसंदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करून घेणार असल्याचे स्पष्ट केले. स्पर्धा परीक्षेची विविध क्षेत्रे, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यांविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम करण्याबाबत आश्वासन दिले. याप्रसंगी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी मॅडम यांनी विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असेल तर अभ्यासात सातत्य, चिकाटी, संयम असल्यास तुम्ही नक्की यश संपादन करू शकता, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा समन्वय डॉ. मनोज जाधव यांनी केले तर डॉ. संतोष कोळी यांनी आभार मानले. प्रा. शाहीन फकीर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

पवन कांबळे यांचा सन्मान करताना प्राचार्या डॉ श्रुती जोशी.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800