ICHMH51NEWS.IN
9921600800

प्रभाग ३ मधील गटारी व रस्त्यांची नियमित स्वच्छता करा; नगरसेविका प्रियांका इंगवले यांची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रभाग ३ मधील गटारी व रस्त्यांची नियमित स्वच्छता करा; नगरसेविका प्रियांका इंगवले यांची मागणी

इचलकरंजी : प्रभाग क्रमांक ३ मधील गटारी व रस्त्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील स्वच्छता व्यवस्था तातडीने सुधारावी, अशी मागणी नगरसेविका डॉ. सौ. प्रियंका प्रसाद इंगवले यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रभागातील गटारी व रस्त्यांची आठ-दहा दिवसांनी स्वच्छता केली जात असल्याने अस्वच्छता निर्माण होत आहे. याबाबत मुकादम व संबंधित कंत्राटदारांकडे वारंवार तक्रारी करूनही कामचुकारपणा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्वच्छतेसाठी भागनिहाय कामगार नियुक्त करण्यात आल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात त्याप्रमाणे कामगार उपलब्ध नसतात. तक्रार केल्यानंतर पाच-सहा कामगार एकत्र करून स्वच्छता केली जाते. मात्र, अशी तात्पुरती कार्यवाही न करता नियुक्त केलेल्या कामगारांनी आपापल्या भागात नियमितपणे स्वच्छता करावी, अशी मागणी इंगवले यांनी केली आहे.
प्रत्येक भागातील कामगारांनी दररोज स्वच्छता केल्यानंतर नगरसेवकांची तसेच संबंधित गल्लीतील नागरिकांची सही घेणे बंधनकारक करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून स्वच्छता व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नगरसेविका प्रियंका इंगवले यांनी केली.

आयुक्त पल्लवी पाटील यांना  निवेदन देताना नगरसेविका डॉ प्रियांका इंगवले,नगरसेवक योगेश पाटील, प्रसाद इंगवले

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा