व्यंकटेश सूतगिरणीच्या व्हाईस चेअरमनपदी दिलीप मुथा
इचलकरंजी : श्री व्यंकटेश शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीच्या व्हाईस चेअरमनपदी माजी नगरसेवक दिलीप काका मुथा यांची एकमताने निवड करण्यात आली. सूतगिरणीच्या संचालक मंडळाची बैठक दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सोलापूर येथील वस्त्रोद्योग विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद भरमा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत संचालक विश्वनाथ मेटे यांनी दिलीप मुथा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर राहुल जाणवेकर यांनी अनुमोदन दिले. उपस्थित संचालक मंडळाच्या सदस्यांनी एकमताने समर्थन केल्यानंतर मुथा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांच्यावर व्हाईस चेअरमनपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
दिलीप मुथा यांनी यापूर्वी इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना विविध सामाजिक, सार्वजनिक तसेच नागरिकांच्या प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव, सामाजिक कार्यातील योगदान आणि संस्थेच्या कामकाजाची जाण लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे चेअरमन अशोक स्वामी यांनी सांगितले.
निवडीनंतर समर्थक, सहकारी, सभासद व हितचिंतकांनी मुथा यांचे अभिनंदन केले. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग सूतगिरणीच्या विकासासाठी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बैठकीनंतर संचालक मंडळातर्फे नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन दिलीप मुथा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन अशोक स्वामी यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
नुतन व्हाईस चेअरमन दिलीप मुथा यांचा सन्मान करताना चेअरमन अशोक स्वामी,विभागीय आयुक्त शिवानंद भरमा
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







