समन्वयातून सेवाकार्याला बळ; लायन्स रिजन ४ ची स्टाफ मिटिंग उत्साहात संपन्न
इचलकरंजी : प्रतिनिधी
लायन्स इंटरनॅशनल प्रांत ३२३४-डी१, रिजन ४ च्या रिजन स्टाफ मिटिंगचे आयोजन रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी स्व. बाळासाहेब दाते लायन्स ब्लड सेंटर, दाते मळा, इचलकरंजी येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
रिजन चेअरमन लायन महेंद्र बालर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस प्रथम उपप्रांतपाल लायन किरण खोराटे, माजी प्रांतपाल लायन विजयकुमार राठी, लायन वासुदेव कलघटगी आणि लायन सुनील सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच झोन चेअरमन लायन रमा बोहरा, लायन डॉ. नागेश वाले, रिजन सेक्रेटरी लायन सचिन येलाजा यांच्यासह रिजनमधील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात घंटानाद, ध्वजवंदन आणि राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर रिजन चेअरमन महेंद्र बालर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपस्थित स्टाफ सदस्यांचा परिचय करून देण्यात आला.
बैठकीत रिजनमधील आगामी सेवाकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रा. लायन डॉ. सर्जेराव पाटील यांनी सदस्यांमध्ये समन्वय वाढवून सेवाकार्याला नवी दिशा देण्याबाबत मार्गदर्शन केले. विविध झोन चेअरमन यांनी आपल्या कल्पना व सूचना मांडल्या.
रिजनमधील विविध क्लबच्या कार्याला अधिक गती देणे, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविणे, सेवाकार्याचा विस्तार करणे तसेच लायन्स इंटरनॅशनलच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. माजी प्रांतपालांनी Club Excellence Award, आगामी GAT Seminar आणि Region Conference याबाबत माहिती दिली.
प्रथम उपप्रांतपाल लायन किरण खोराटे यांनीही मार्गदर्शनपर संबोधन केले. या बैठकीच्या माध्यमातून आगामी सेवाकार्याचे नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण दिशा निश्चित करण्यात आली.
“We Serve” या लायन्स इंटरनॅशनलच्या सेवाभावी ब्रीदवाक्यानुसार समाजोपयोगी उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शेवटी रिजन सेक्रेटरी लायन सचिन येलाजा यांनी आभार मानले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







