ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथे कायदेविषयक जागरुकता शिबीर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी

 येथे कायदेविषयक जागरुकता शिबीर

इचलकरंजी
मा. श्री. एल. डी. बिले, अध्यक्ष हातकणंगले तालुका विधी सेवा समिती, इचलकरंजी तथा जिल्हा न्यायाधीश-१, इचलकरंजी यांचे मार्गदर्शनाखाली हातकणंगले तालुका विधी सेवा समिती, इचलकरंजी व इचलकरंजी बार असोसिएशन, इचलकंरजी व श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी यांच्या संयुक्त विदयमाने कायदेविषयक जागृकता शिबीराचे आयोजन करणेत आले होते.
आजचे कार्यक्रमास वाहतूकीचे नियमा विषयी बोलताना मोटार वाहन पोलीस निरीक्षक श्री आदित्य जाधव यांनी सांगितले की, वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावयाचा आहे.  वाहन चालविताना कानात हेडफोन वापरु नये. वाहन एकेरी मार्गामधून चालवू नये. रस्त्यावरील वाहतुक चिन्हांचे पालन करावे. चारचाकी चालवतान सिट बेल्टचा वापर करावा. तसेच रस्तावरुन चालण्याचे नियम सांगितले. अठरा वर्षांखालील विद्यार्थिनींनी वाहन चालविल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई, आर्थिक दंड व शिक्षेच्या तरतुदी याबाबत त्यांनी माहिती दिली.
अॅडव्होकेट रागिणी मोरबाळे यांनी महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, रॅगिंग म्हणजे विदयापीठ , महाविद्यालय मध्ये शिक्षण घेणा-या विदयार्थ्याकडून काेणतीही लेखी किंवा ताेंडी कृती करणे की, ज्यामुळे एखादया विदयार्थ्याला दुख किंवा कष्ट होईल असे असभ्य वर्तन करणे. छळ करणे, एखादया विदयार्थ्याला त्याच्या मनाविरुदध कृत्य करणेस भाग पाडणे. त्यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण करणे. इतर विदयार्थ्यासमोर अपमानास्पद वागणूक देणे,अमानवीय गैर प्रकार करणे या सारख्या बाबींचा रॅगिंगमध्ये समावेश होतो. विद्यार्थिनींनी रॅगिंगला पूर्णपणे नकार देऊन एकमेकींचा सन्मान करावा, असा संदेश देत “Stop Ragging – Be Respectful” हा संदेश विद्यार्थिनींच्या मनावर बिंबविला. तसेच रॅगिंग प्रतिबंधक कायदयानुसार होणा-या शिक्षाचे तरतूदी सांगितले.
अॅडव्होकेट श्री पृथ्वीराज झपाटे यांनी उपस्थीतांना लैंगिक गुन्हापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ या बाबतीत मागदर्शन करणेत आले. या कायद्यांतर्गत बालकांवर होणाऱ्या गुन्हांची नोंद त्वरित घेतली जाते आणि खटले जलदगती न्यायालयात चालवले जातात. बालकाचा लैंगिक छळ करणे. लैंगिक हेतूने शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे किंवा इतर शारीरिक संपर्क साधणे अशा गुन्हास कडक शासन केले जाते. अशा गैरप्रकारापासून विदयार्थ्यानी दूर रहावे. तसेच या कायदया अंतर्गत होणा-या शिक्षाचे तरतूदी सांगितले.
चाइल्ड-फ्रेंडली लिगल सर्विसेस फाॅर चिल्डन या योजनाबाबत सांगितले. तसेच विदयार्थ्याना कायदेशीर मदतीकरीता लागणारे महत्वाचे हेल्पलाईन क्रमांक सांगितले.
आजचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस. एस. पाटील सर यांनी केले व सुत्रसंचालन  सौ. आर. पी. इंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन व्ही. एम. पाटील सर यांनी केले. श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी च्या मुख्याध्यापिका सौ. व्ही एस लोटके यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार पुष्पगुच्छ देउन केला. सदर कार्यक्रमास अॅडव्होकेट हेमलता नेमिष्टे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे नियोजनांस दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष श्री राजाराम सुतार, सचिव श्री अभिजीत माने, सहसचिव श्री आदित्य मुदगल, खजिनदार श्री विजय शिंगारे, श्री शैलेंद्र रजपूत, श्री राहूल काटकर, श्री महेश कांबळे, महिला प्रतिनिधी अॅडव्होकेट दिपाली हणभर, अर्चना कुलकर्णी ­ ओगले, किर्ती जैंद व कोल्हापूर जिल्हा नोटरी संघाचे अध्यक्ष, अॅडव्होकेट अमित सिंग, अॅडवोकेट सारंग जोशी, अॅडव्हाकेट  लाजीम मुजावर, अॅडव्हाकेट मुकुंद आजरेकर, एडवोकेट प्राध्यापक शरद शिंदे, एडवोकेट विजयकुमार इंग्रोळे हुपरी व विधी सेवा समितीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिरजकर, श्री अभिजीत माने व बार असोसिएशनचे क्लार्क श्री प्रविणभाउ फगरे यांनी विशेष प्रयत्न केले.
सदर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरास श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजीच्या विदयार्थीनी व शिक्षक, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा