DKTE पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बुद्धिबळाचे सिमलटेनियस प्रदर्शन
३२ विद्यार्थ्यांचा सहभाग; आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंसोबत रंगले सामने
इचलकरंजी :
येथील DKTE सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सिमलटेनियस चेस एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले. केन चेस अकॅडमी, इचलकरंजी यांच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
FIDE D.I. रोहित पोळ, संस्थापक केन चेस अकॅडमी, यांनी एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळाचे सामने खेळत त्यांना डावपेच, रणनीती, एकाग्रता, संयम आणि निर्णयक्षमता याबाबत मार्गदर्शन केले. या प्रदर्शनात सुमारे ३२ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळपटू रोहित पोळ, अथर्व तावरे आणि रुद्र माने यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सामने खेळले. यावेळी वेद शिंगारे याने रुद्र माने यांच्याविरुद्ध उत्कृष्ट खेळ करत सामना बरोबरीत राखला. तसेच श्रवरी आंबी आणि कीर्तीकुमार बागडे यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या उत्कृष्ट खेळाची दखल घेत त्यांना विशेष बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. पी. कोथळी होते. यावेळी रमेश खोत, जगताप, मनोजकुमार सुतार, रुग्गे मॅडम व कांबळे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, तार्किक विचारशक्ती, रणनीती आखण्याची क्षमता, संयम आणि आत्मविश्वास वाढतो, असे मान्यवरांनी सांगितले.
बुद्धिबळ सामन्यातील एक क्षण
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






