ICHMH51NEWS.IN
9921600800

केन चेस अकॅडमीचा डबल धमाका; हर्ष व नारायणीला आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंग

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

केन चेस अकॅडमीचा डबल धमाका; हर्ष व नारायणीला आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंग

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील केन चेस अकॅडमीच्या दोन युवा बुद्धिबळपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. अकॅडमीची विद्यार्थीनी कु. नारायणी घोरपडे (कोल्हापूर) हिने रॅपिड प्रकारात १४५९, तर चि. हर्ष मादनाईक (शिरोळ) याने १४०७ आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशामुळे इचलकरंजी परिसराच्या बुद्धिबळ क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ही बाब अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे.

नारायणी आणि हर्ष हे दोघेही केन चेस अकॅडमी, इचलकरंजी येथे नियमित बुद्धिबळ प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना फिडे डी.आय. रोहित पोळ यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रोहित पोळ हे आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळपटू असून वरिष्ठ राष्ट्रीय पंच आहेत. तसेच रौप्यपदक विजेत्या महाराष्ट्राच्या शालेय बुद्धिबळ संघाचे त्यांनी तीन वेळा प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

प्रत्यक्ष प्रशिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेही बुद्धिबळाचे मार्गदर्शन करण्यात येत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे.

नारायणी व हर्ष यांच्या या यशाबद्दल केन चेस अकॅडमीसह पालक, प्रशिक्षक आणि बुद्धिबळप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सातत्यपूर्ण सराव, योग्य प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक अनुभवाच्या बळावर दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय रेटिंगचा टप्पा गाठल्याने भविष्यात त्यांच्याकडून आणखी उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केन चेस अकॅडमीचे प्रशिक्षण केंद्र इचलकरंजी व जयसिंगपूर या दोन्ही ठिकाणी सुरू असून नवोदित बुद्धिबळपटूंना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा